श्री गजानन महाराजांची आरती

!! गण गण गणात बोते !!


|| अनंत कोटी ब्रम्हाण्ड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिँतानंद

भक्त प्रतिपालक शेगाँव निवासी समर्थ सदगुरु श्री संत गजानन महाराज की जय ||

 


।। श्री गजानन महाराजांची आरती ।।

जय जय सतचितस्वरूपा स्वामी गणराया |

अवतरलासी भूवर जड़ -मूढ  ताराया ||

जयदेव जयदेव || धृ.||


निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी |

तें तूं तत्त्व खरोखर नि:संशय  अससी |

लीलामात्रे धरिले मानवदेहासी || १ ||


होऊ न देशी त्याची जाणिव तू कवणा  |

करुनि 'गणि गण गणात बोते' या भजना |

धाता नरहरि गुरुवार तूची सुखसदना |

जिकडे पाहावे तिकडे तू दिससी नयना  || २ ||


लीला अनंत केल्या बंकटसदनास |

पेटविले त्या अग्नीवाचुनि चिलमेस |

क्षणात आणिले जीवन निर्जल वापीस |

केला ब्रह्मगिरीच्या गर्वाचा नाश || ३ ||


व्याधी धारून केले कैकां संपन्न |

करवियले भक्तालागी विट्ठलदर्शन |

भवसिंधु हां तरण्या नौका तव चरण |

स्वामी दासगणूचे मान्य करा वचन || ४ ||